माझा आवडता सण होळी मराठी निबंध

माझा आवडता सण होळी मराठी निबंध 

my favorite festival holi essay in marathi 

माझा आवडता सण होळी मराठी निबंध - my favorite festival holi essay in marathi
माझा आवडता सण होळी मराठी निबंध - my favorite festival holi essay in marathi 


होळी हा माझा आवडता सण आहे.  होळी हा महाराष्ट्रातील एक खूप मोठा सण असून त्याला कोकण भागात शिमगा म्हटले जाते. 

होळीच्या दिवशी प्रत्येक घरात आनंदी आनंद असतो.  मी होळीच्या निमित्ताने पालकांसह तालुक्याच्या बाजारात खरेदीला जातो.  मी नवीन कपडे, रंग, पिचकारी खरेदी करतो.   

रंगाचा सण म्हंटल की होळी हा सण आठवतो. या दिवशी सर्व लोक आपले जुने राग, दुष्मनी विसरून एकमेकांना रंग, गुलाल लावतात. त्यात लहान मुले आणि तरुणांमध्ये या दिवसाची जास्त उस्तुकता असते.

वसंत ऋतू च्या स्वागतासाठी सुद्धा होळी साजरी केली जाते.
मी माझ्या मित्रांवर रंग फेकतो.  मित्रही माझ्याबरोबर रंगबेरंगी अशी होळी खेळतात. 

वडीलधारी मंडळी माझ्या कपाळावर कुंकवाचा टिक्का लावून मला ओवाळून आशीर्वाद देतात.  

माझा आवडता सण होळीची कथा

होळी बद्दल तश्या खूप कथा प्रचलित आहेत, पण सगळ्यात जास्त प्रचलित ती म्हणजे भक्त प्रल्हाद कथा. 

हिरण्यकशिपू नावाचा एक राजा होता, त्याला एक मुलगा होता प्रल्हाद नावाचा. राजा हिरण्यकशिपूला देव कधीच आवडत नसत आणि त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा खूप मोठा भक्त होता. तो दिवस रात्र देवाचे नाव जपायचा.
 
राजा हिरण्यकशिपू प्रल्हादच्या भक्तीने व जपाने संतप्त होत असे, म्हणून त्याने स्वतःच्या मुलाला म्हणजेच प्रल्हादला जीवे मारण्याचे ठरवले. 


त्याची होलिका नावाची एक असुर बहीण होती. तिच्या कडे एक जादुई शक्ती असलेले वस्त्र होते, जे तिला भयानक आगीपासून सहज वाचवू शकत होते.

ह्या असुर होलिकाने प्रल्हाद ला आगीत जाळून मारण्याचा कट केला. ती प्रल्हादला घेऊन धगधगत्या चिते वर बसली, 

हिरण्यकशिपूला असे वाटले कि आता प्रल्हाद जळून जाईल आणि होलिका सुखरूप आगीतून बाहेर येईल. पण विष्णूच्या कृपेने उलटे झाले, होलिका आगी मध्ये जळून गेली आणि भक्त प्रल्हाद आगीतून सुखरूप बाहेर आला. अशी ही होळीची कथा.

खूप वर्षां पूर्वी गावचे सगळे लोक वादविवाद विसरून होलिका दहन साठी एकत्र येत असत. त्या साठी लागणारी लाकडं, गवात मिळून जमा करत असत. सर्व स्त्रिया एकत्र नैवद्य बनवत, पूजेची तैयारी करत असत.

मला रंगांचा उत्सव होळी खूप आकर्षक वाटतो.  हे आपल्याला वाईटापासून दूर राहण्याचे आणि चांगल्या मार्गावर चालण्याचे शिकवते.म्हणून मला होळी हा रंगाचा सण खूप आवडतो.

तुम्ही लिहिलेला होळी निबंध आम्हाला पाठवा आम्ही तो आमच्या वेबसाईटवर तुमच्या नावासह पोस्ट करू.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने