5 जून पर्यावरण दिवस

पर्यावरण निबंध
Paryavaran essay in marathi


5 जून हा जागतिक स्थरावर " पर्यावरण दिवस" मानला जातो. आपण पर्यावरणात जर समतोल राखला तरच मनुष्य भूतलावर जिवंत राहील. पर्यावरण म्हणजे काय तर पृथ्वीवरील आणि पृथ्वीभोवतालच्या वातावरणाचा समतोल होय. 

समतोल राखण्यासाठी वृक्ष, झाडे आपल्याला खूप मदत करतात म्हणूनच तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वृक्षांची, रोपांची पूजा करण्याची खूप जुनी परंपरा आहे तीला तर खूप दूरदृष्टीची म्हणावी लागेल. याचा आपल्याला अभिमान हवा.

दररोज संध्याकाळी तुळशीला मातेला ताजे पाणी घालून तिच्याजवळ पणती लावायची, वड - पौर्णिमेला घराजवळ असलेल्या वडाची पूजा करायची. त्यामुळे कायतर झाडांची निगा राखली जाते व त्यांचे जतन होते. पर्यावरणाचा समतोल साधतो. 

पर्यावरण माहिती 

झाडे  ही उत्तम प्रकारे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात, ऑक्सिजन बाहेर फेकतात ग्लोबल वॉर्मिंगपासूनही आम्हाला हे वृक्ष वाचवतात.  मात्र रात्री बऱ्याचपैकी झाडे ऑक्सिजन सोडत नाहीत त्यामुळे रात्री झाडांजवळ जाऊ नये असे म्हंटले जाते.

एकाच ठिकाणी स्थिर असलेली झाडे उन, वारा, पाऊस सहन करून दुसऱ्यांना सावली देतात. लाकूड, फळे, फुले, बिया, साल आणि औषधीमुळे सुद्धा आम्हाला हे वृक्षच देतात की.


पाणी हेच जीवन मराठी निबंध


पक्षी, प्राणी असे अनेक जीव झाडांच्या आश्रयाला राहतात. झाडे वाचली तर पर्यावरण सुरक्षित राहील आणि पर्यावरण सुरक्षित तर आपण सुरक्षित असू,  म्हणून जंगलांचे रक्षण आपण केलेच पाहिजे. 

Paryavaran divas

जंगले तयार व्हायला हजारो वर्षांचा काळ लागतो.  तर जंगले तोडायला मात्र अगदी काही दिवस पुरतात हे आम्ही विसरत चाललो आहोत.

उद्योगधंदे, कारखाने यांची बेफाम वाढ आज होते आहे. माणसे शहराकडे धाव घेत आहेत, या साऱ्यासाठी निर्दयपणे झाडे तोडली जातात. मनुष्य वृक्षप्रेमाचे हे जुने नाते पार विसरला आहे. आता स्वतःच्या सवयी बदलायची वेळी आली आहे.

कागदापेक्षा ई-मेलचा अधिक वापर, कमी ऊर्जेचे दिवे, वापरून फेकण्याच्या वस्तूंऐवजी चिनी मातीच्या कपबश्या, पेपर नॅपकीन ऐवजी सुती टॉवेल, पाण्याचा जपून वापर हे आम्ही करायला हवे. पर्यावरणाचे भान आम्ही ठेवले तरच मानवजात वाचण्याची शक्यता आहे.

जगाला वाचविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवसाची योजना करण्यात आली आहे.

Post a Comment