आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो, आजचा आपला निबंधाचा विषय आहे ! आदर्श विद्यार्थी मराठी निबंधतुम्हाला सुद्धा वाटत ना, शिक्षकांनी तुम्हाला आदर्श विद्यार्थी समजावे, तुम्हाला माहिती आहे का ? विद्यार्थी आणि शिस्त याचे एक नातेच आहे. विद्यार्थी कसा असावा ! विद्यार्थी आणि शिस्तीचे महत्व आपण ह्या निबंधांतून समजून घेऊया. तर चला सुरू करू आपला आदर्श विद्यार्थी निबंध. An ideal student essay in marathi | adarsh vidyarthi nibandh in marathi


आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi
आदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi


विद्यार्थी आणि शिस्तीचे महत्व हे ज्याला समजले, त्याला आयुष्यभर कोणी वाईट शेरा मारणार नाही. शाळेला विद्यामंदिर समजुन तेथील शिक्षकरुपी व्यक्तीला गुरू समजून ! तो जे काही शिकवेल ते आत्मसात करायला पाहिजे. कारण शिक्षक जीव तोडून आपल्या भल्यासाठी, आपल्याला शिकवत असतो. त्याचा एकच हेतू असतो, मी जे काही शिकवले त्याचा फायदा माझ्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे.


आपला भविष्य चांगला व्हावा यासाठी तो प्रयत्नशील असतो. उद्या भविष्यात त्यांच्या कडून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी, कुठे उच्च पदावर नोकरी करीत असतील किंवा चांगला धंदा करती असतील. तर शिक्षकांचा उर भरून येतो, त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो व शिकवणी सार्थकी लागल्याचे बर वाटत व मनाला वेगळेच समाधान मिळते,  कारण ते एकेकाळी शाळेतील आदर्श विद्यार्थी असतात. कष्ट करून ते त्या पदावर पोचलेले असतात.

आदर्श विद्यार्थी हा, शाळेत जाण्यासाठी सकाळी लवकर उठतो व शाळेत जायला वेळेवर तयार होतो, स्वतःची बॅग स्वतः भरतो, आई वडिलांना त्रास देत नाही. हाताची व पायाची बोटे व्यवस्थित कापलेली आहेत की नाही याची पडताळणी करतो. केस जास्त वाढलेले असतील तर तो लहान लहान कापून घेतो. तसेच केसांची ठेवण व्यवस्थित ठेवतो. स्वतःचा गणवेश एकदम स्वच्छ व टापटीप ठेवतो. 

ग्रंथ हेच गुरू


शाळेत जाण्यापूर्वी देवाला नमस्कार करून घरातील वडील धाऱ्या व्यक्तींना नमस्कार करतो. विद्यार्थी जीवनात शिस्तीचे महत्व जाणून तो आदर्श विद्यार्थी अगदी वेळेत शाळेत हजर राहतो. शिक्षक दिसले की त्यांना आदराने प्रणाम करतो. शिक्षकांना त्यांच्या पाठीमागे उलटे बोलत नाही, नावे ठेवत नाही. टिंगल - टवाळी करीत नाही. असा विद्यार्थी सर्वाना प्रिय असतो.


विद्यार्थी हा बुद्धिवान असावा, तो फक्त पाठांतर न करता विषय समजून घेणारा असावा ! अभ्यास करता करता त्याने शाळेतील खेळांमध्ये स्वतःला वेळ दिला पाहिजे, खो खो, कबड्डी, क्रिकेट, फुटबॉल, हॉलीबॉल, बॅडमिंटन सारखे खेळ सुद्धा त्याने खेळायला हवेत. तसेच आजचा विद्यार्थी हा विद्यार्थी जीवन जगताना व्यसनी नसावा ! तो व्यसनांच्या आहारी गेलेला नसावा तर चांगल्या सवयी अंगी लावणारा असावा.

विद्यार्थी जीवनात शिस्तीचे महत्व ओळखून, तो शिस्तप्रिय असावा. तो चांगल्या मूल्यांवर चालणार असावा. आजचा आदर्श विद्यार्थी हा छत्रपती शिवाजी महाराजE, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद यांना आदर्श मानणारा असावा ! खऱ्याला खर व खोट्याला खोट बोलण्याचे त्याच्याकडे धाडस असावे. तो सत्यप्रिय असावा. 

माझी शाळा


आजचा अभ्यास उद्यावर न टाकता, आजच पूर्ण करणारा विद्यार्थी हा आजचा आदर्श विद्यार्थी असेल. शाळेमधील सर्व विषयांचा चांगला अभ्यास करून, चांगल्या गुणांनी परीक्षेत उत्तीर्ण होणारा असावा. तसेच त्याच्या मध्ये वक्तृत्वकला असावी, शाळेमध्ये होणाऱ्या स्पर्धेत तो सहभागी होणारा असावा ! आजचा विद्यार्थी 15 ऑगस्ट, 26 जानेवारी यासारख्या राष्ट्रीय उत्सवात स्वतःहून भाषण करणारा त्यातील सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित झाल्यास त्यात सहभागी होणारा असावा.


घरच्यांना घरच्या कामामध्ये मदत करणारा असावा. जे वृद्ध व्यक्ती, अशक्त यक्ती असतील यांना सुद्धा मदत करणारा विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी ठरेल, ज्याला स्वतःचा देशाबद्दल, राज्याबद्दल प्रेम असेल, जो आपल्या सणांचा, संस्कृतीचा मान ठेवेल, मित्रांना दिलेल्या शब्दांचे पालन करेल. असा आजचा विद्यार्थी आदर्श विद्यार्थी नक्की ठरेल.

तर मित्रहो कसा वाटला हा निबंध - आजचा आदर्श विद्यार्थी | aajcha adarsh vidyarthi | an ideal student essay in marathi. hitechmarathi.
खाली कमेंट करून नक्की सांगा, धन्यवाद.
 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने