मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध | mi pantpradhan jhalo tar marathi essay

मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध |  mi pantpradhan jhalo tar marathi essay


मी पंतप्रधान झालो तर | If i were prime minister essay in marathi हा निबंध सुरू करण्याअगोदर आपण काही गोष्टी जाणून घेऊया ! आपला भारत देश हा सर्वात मोठी लोकशाही असलेला एक देश, ज्या देशात राष्ट्रपती हा वास्तववादी प्रमुख तर पंतप्रधान हा कार्यकारी प्रमुख म्हणून कार्य करतो याचाच अर्थ की सर्वात जास्त सत्ता व ताकद ही पंतप्रधान पदाला आहे.  

आपल्या भारतीय घटनेत कलम 74 प्रमाणे राष्ट्रपती यांना सल्ला देण्यासाठी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रीमंडळ असेल व कलम 75 प्रमाणे राष्ट्रपती पंतप्रधान यांची नियुक्ती करतात अस्सं उल्लेख आहे. तर करूया आपल्या निबंधाला सुरुवात, 


If i were prime minister मी पंतप्रधान झालो तर 


मी मंत्री महोदय ईश्वर साक्ष शपथ घेतो की, विधी द्वारे स्थापित, भारताचे संविधाना प्रति निष्ठा राखील ! खरच असा दिवस जर माझ्या नशिबात उजाडला तर ? जर आपल्या भारत देशाचा मी पंतप्रधान झालो तर ! देशासाठी, देशातील नागरिकांसाठी काय काय करेल ? 

मी पंतप्रधान झालो तर सर्वप्रथम, भारतीय सैनिक जे भारतीय सीमेवर ऊन, पाऊस, वारा यांचा विचार न करता, आपल्या देशाचे डोळ्यात तेल घालून सरंक्षण करीत आहेत, त्यांना जाऊन भेटेन त्यांच्या अडी अडचणी समजून घेईल. त्यांना थंडीमध्ये स्वतःचे संरक्षण करता येईल अशी कपडे, स्वेटर, सॉक्स व बूट देण्याचा प्रयत्न करील. 


मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध |  mi pantpradhan jhalo tar marathi essay

मी पंतप्रधान झालो तर निबंध मराठी




थेट भारतीय सीमेवर सहज जाता येतील असे रस्ते तयार करील. भारतीय सैन्याचे मनोबल वाढेल असे कार्यक्रम व कामे करील. त्यांना अद्यावत हत्यारे, यंत्रणा व वाहने देईल. मी पंतप्रधान झालो तर ! भारतीय सैनिकांना सरकारी रेल्वे व विमान, बस प्रवास करण्यासाठी खास करून घरी सुट्टीवर जाताना प्रवास हा फुकट असेल. 

भारतीय सैनिकांचा प्रश्न मिटलेनंतर भारतीय अर्थव्यवस्थेकडे लक्ष देईल. माझे मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून एका हुशार ज्यास अर्थव्यवस्थेचे ज्ञान असेल अश्या व्यक्तीला अर्थमंत्री बनवेल व भारतीय अर्थव्यवस्थेची योग्य घडी घालण्याचा प्रयत्न करेल. इतर मंत्र्याना सुद्धा भ्रष्टाचार न करण्याचा सल्ला देऊन जो कोणी देशाची सेवा न करता भ्रष्टाचार करेल, त्यास योग्य शासन केले जाईल असे परिपत्रक काढेन.

आपल्या देशातील बेरोजगारी कमी करण्याचा अतोनात प्रयत्न करेल व बेरोजगारीचा टक्का खूपच कमी करेल. कमीत कमी प्रत्येक घरातील एक कर्ता व्यक्ती हा कोठे न कोठे एका चांगल्या ठिकाणी कामावर असेल ज्यामुळे त्याच्या घरातील कोणी उपाशी राहणार नाही. 

याचबरोबर सरकारी नोकरी देताना कोणत्याही आरक्षित जागा नसतील. प्रत्येक सरकारी ठिकाणी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा जो गुणवत्ता यादीत येऊन उत्तीर्ण होईल त्यास सरकारी नोकरी दिली जाईल. मात्र ही नोकरी कोणत्याही जात व धर्माच्या आधारे न देता ! ती गुणवत्तेच्या आधारे दिली जाईल. कारण आपल्या देशात सर्वात वाईट रोग आहे तो म्हणजे जातीयवाद !

मी पंतप्रधान झालो तर ! सर्वात महत्वाचा प्रश्न मिटवेल, तो म्हणजे शेतकरी वर्गाचा. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पिकणाऱ्या पिकांचे बद्दल योग्य भाव देण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. जेवढे आर्थिक दृष्टीने गरीब शेतकरी आहेत, त्यांचे धान्य योग्य भावात खरेदी करून, आर्थिक परिस्थितीने गरीब व्यक्तींना देण्याचा माझा हेतू असेल. माझी एकच इच्छा असेल जर मी पंतप्रधान झालो तर कोणी माझ्या देशात भुकेने मरण नाही पावला पाहिजे. 

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध


यानंतर येतो प्रश्न शिक्षणाचा ! सरकारी शाळेतील शिक्षण हे जागतिक पातळीवरील असेल. इथे शिकवणारे शिक्षक सुद्धा उच्च पदवीधर असतील, नाही की कोणाच्या वशील्याने भरती झालेले शिक्षक. ह्या विद्यामंदिरात विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त नोकरी व काम धंदा यांच्या क्षेत्रात फायदेशीर ठरतील असे कोर्सेस असतील. फक्त पोपटपंची किंवा नोकरदार निर्माण करणारे शिक्षण नसेल.

गाव स्तरावर तसेच नगर स्तरावर रस्ते, वाहतूक, वीज, पाणी व हॉस्पिटल यांची उत्तम सोय करेल, ज्या नागरिकांना अशी सोय नसेल त्यांच्यासाठी एक तक्रार निवारण केंद्र स्थापन करेल व त्या केंद्राच्या मदतीने स्थानिक आमदार, खासदार यांची कानउघाडणी करून, त्यांचेकडून ती कामे उत्कृष्ट दर्जाची करून घेईल. नागरिकांना जमिनीची कागदपत्रे, इतर काही सेवा, गोष्टी फुकट मध्ये तलाठी, ग्रामसेवक यांना देण्याच्या सूचना देईल. कारण शेतकरी आहे म्हणून आपण आहे.

मी पंतप्रधान झालो तर, जागतिक स्तरावर भारत देशाचा दबदबा निर्माण करेल, इस्रो सारख्या संस्थांना चांगल्या सुविधा पुरविण्यात येतील, जेणेकरून त्यांचा काम करण्याचा हुरूप वाढेल व त्यांचेकडून देशासाठी अनेकानेक शोध मोहीम व यंत्रणा तयार होईल. 

तर विद्यार्थी मित्रांनो कसा वाटला,  मी पंतप्रधान झलो तर मराठी निबंध |  mi pantpradhan jhalo tar marathi essay तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्स मध्ये द्या. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने