स्वातंत्र्य दिन मराठी निबंध | marathi nibandh on independence day

आज आपल्याला निबंधाचा विषय आहे स्वातंत्र्य दिन मराठी निबंध, आपल्याला देशाला स्वातंत्र्य दिन साजरा करायला अपार कष्ट घ्यावे लागले, अनेकांना आहुत्या द्यावा लागल्या तेव्हा कुठे भारत देश गोऱ्यांच्या गुलामगिरीतुन जिंकून विजयी झाला व 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर साजरा झाला आपला पहिला स्वातंत्र्य दिन. तर करू करूया आपल्याला निबंधाला स्वातंत्र्य दिनावर मराठी निबंध, marathi nibandh on independence day, essay on independence day in marathi.

स्वातंत्र्य दिन मराठी निबंध |  marathi nibandh on independence day 


ऐ आब ए रूद ए  गंगा,  वह दिन हैं याद तुझको ?
उतरा तिरे किनारे जब कारवा हमारा
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा 
हम बुलबुले हे इसकी यह गुलसिता हमारा !! 

अश्या वाक्यात कवी इकबाल यांनी भारत देशाची साजेशी स्तुती केलेली आहे. अनेक आक्रमणे झेलून सुद्धा ताठमानेने आज जगात स्वतःचे अस्तित्व, दरारा निर्माण करून उभा असलेला माझा देश म्हणजेच भारत. 
 
स्वातंत्र्य दिन मराठी निबंध marathi nibandh on independence day
marathi nibandh on independence day


अनेक राजे - रजवाडे, संस्थानिक आपले राज्य स्थापन करून जगत असताना, अचानकपणे व्यापारी हेतूने पोर्तुगीज, डच, फ्रेंच व इंग्रज भारतात आले व येथील अफाट संपत्ती पाहून ते इथेच स्थायिक झाले.

एक एक करून इंग्रजांनी स्वतःचे प्रतिस्पर्धी कमी केले व कपटनीतीचा वापर करून, राज्या - राज्यात, फंदफितुरी करून एकमेकात भांडण लावून, अनेक राज्य नष्ट करून त्यावर स्वतःचा ताबा मिळवला.

तोडा, फोडा व राज्य करा ह्या उक्तीचा वापर करून इंग्रजांनी भारत देशावर राज्य व केले व आपला भारत देश पारतंत्र्यात ढकलला गेला. हे सहन न झाल्याने अनेक क्रांतिकारकानी देशासाठी बलिदान दिले.

त्यात, इंग्रज भारतीयांना स्वतःच्या देशातच वाईट वागणूक देत होते, त्यामुळे भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, सुखदेव, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाईमहात्मा गांधीजी,  सुभाषचंद्र बोस असे अनेक भारतमातेचे पुत्र अहोरात्र झटले काही शहीद झाले तर काहींनी कारावास पत्करला.

अश्या असंख्य आहुती नंतर दिल्ली येथील लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचा स्वतःचा ध्वज तिरंगा फडकला व शहिदांचे बलिदान सार्थकी लागले.

हा रक्तरंजित इतिहास आपल्या भारत देशाचा त्यामुळे, आम्ही आमच्या शाळेतर्फे दरवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहण करण्याचा कार्यक्रम व स्वातंत्र्य दिनाचे निमित्त साधून भाषणाचा कार्यक्रम आयोजित करतो.

स्वातंत्र्य दिनावर मराठी निबंध


एक दिवस अगोदर सर्व कार्यक्रमाची रूपरेषा व नियोजन ठरलेले असते, त्यानुसार आम्ही सर्व विद्यार्थी शाळेची साफसफाई करतो व ध्वजारोहणाची तयारी करतो. प्रमुख अतिथी आल्यानंतर त्यांच्या हस्ते आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण होते. 

ध्वजारोहण झालेनंतर गावामध्ये प्रभातफेरीचे आयोजन केले जाते. वंदे मातरम, भारत माता की जय, जय जवान जय किसान अश्या घोषणांनी सर्व गाव दुमदुमून जाते, अश्यावेळी आमच्या डोळ्यासमोर येतो तो, बाल शिरीषकुमार ज्याने स्वतःला गाडी खाली झोकून दिलेले.

डोळ्यासमोर उभे राहतात, लाठी हल्ला झेलणारे लाला लजपतराय, ज्यांच्या आहुती मुळे आपण स्वतंत्रता अनुभवत आहोत, त्यांना नमर करून पुन्हा आम्ही शाळेत, पटांगणात हजर होतो.

प्रभातफेरीच्या कार्यक्रमानंतर प्रमुख अतिथी स्वतःचे मनोगत व्यक्त करतात, त्यानंतर शाळेचे शिक्षक वर्ग, मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थ यांची भाषण होतात, ते भारतीय स्वतंत्र युद्ध याबद्दल माहिती देतात.  कोणी काकोरी कटाबद्दल माहिती देते. तर कोणी 1857 चा उठाव हा विषय घेऊन आपले मत व्यक्त करतो. 

सर्वात शेवटी शालेय विद्यार्थी भाषण करतात व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होतो. ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा मानबिंदू हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट हा विषय असतो.

यामध्ये काही विद्यार्थी समूहगीत गातात, अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, ललकारत सारे, ध्वज विजयाचा उंच धरा रे ! उंच धरा रे ! अस एका तालात गातात.  यावेळी शरीरातील रक्त खवळून अंगावर शहारे उभे राहतात.

या दिवशी स्वतःच्या शर्टवर तिरंगा लावून मिरवण्यात, तो वागवण्यात एकप्रकारचा अभिमान वाटतो, खरच मी भाग्यवान आहे की ह्या पवित्र गंगेच्या, हिमालयाच्या कुशीत जन्माला आलो. 

सर्व कार्यक्रम संपलेनंतर महत्वाचा कार्यक्रम सुरू होतो, चॉकलेट व नाश्ता, पेढा, लाडू वाटपाचा ! शाळेतील विद्यार्थ्यांना आजचा दिवसाचा म्हणजेच 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाच्या दिवशी गोड पदार्थ खाण्यात स्वतंत्र दिन साजरा करण्यात वेगळीच मज्या, अभिमान वाटतो.

आता 15 ऑगस्ट स्वतंत्र दिनाची सांगता होते. कारण, ज्यादिवशी शाळेला सुट्टी म्हणजे अर्धी शाळा असते. दुपारनंतर सर्वाना घरी जाण्यास मोकळीक असते. खाकी पॅन्ट व सफेद शर्टवरील प्रत्येक विद्यार्थी तिरंग्याला सलाम ठोकतो व एक भारतीय असल्याचा अभिमान बाळगत घरी निघून जातो.

जय हिंद जय महाराष्ट्र

तर कसा वाटला आपला स्वतंत्र दिनावर मराठी निबंध, essay on independence day in marathi तर असेच अनेक निबंध हवे असतील तर ह्या वेबसाईटवर सहज मिळून जातील, search box मध्ये संबंधित निबंधाचे नाव मराठी किंवा इंग्रजी मध्ये शोधा.

अजून कोणत्याही विषयावर निबंध हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. 
धन्यवाद all Rights reserved essaysmarathi.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने