रक्षाबंधन मराठी निबंध | essay on raksha bandhan in marathi

रक्षाबंधन मराठी निबंध | essay on raksha bandhan in marathi


तुमचे स्वागत आहे हक्काच्या मराठी निबंध व्यासपीठावर. आजचा आपला निबंधाचा विषय आहे, रक्षाबंधन मराठी निबंध. भाऊ बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला हा विषय. 

खूप संवेदनशील तसेच भावनिक कड असलेला हा सण. त्यामुळे त्याला हळूवार हाताळावा लागेल. तर जास्त वेळ घेण्यापेक्षा सुरू करूया आपला निबंध raksha bandhan essay in marathi. 

रक्षाबंधन निबंध मराठी | marathi essay on raksha bandhan


हा उत्सव प्रेमाचा, शिडकावा करतो चंदनाचा
क्षण भाऊ बहिणीच्या लाडाचा, हा सण रक्षाबंधनांचा

भारतीय संस्कृती ही एक वैशिष्ट्यपूर्ण व दुर्मिळ अशीच आहे, कारण भरतासारखे सण, उत्सव, आपली भारतीय परंपरा जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात शोधली तरी शोधून मिळणार नाही. नेपाळ तसेच मॉरिशस देश सुद्धा हा सण साजरा करतात. हे विशेष म्हणावे लागेल ! उत्तर भारतात ह्या सणाला कजरी पौर्णिमा म्हणतात आपण मराठी लोक यालाच तर नारळी पौर्णिमा म्हणतो.

रक्षाबंधन याचा अर्थ काय ? रक्षाबंधन का साजरा केला जातो ? अशी अनेक प्रश्न पाश्चिमात्य लोकांना पडतात. त्यावर एकाच वाक्यात उत्तर द्यायचे म्हंटल तर ! भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारा हा सण आहे. 

रक्षाबंधन मराठी निबंध essay on raksha bandhan in marathi

रक्षाबंधन निबंध मराठी | essay on raksha bandhan marathi



भाऊ व बहिणीच्या नात्याला एका वेगळ्याच उंचीवर पोचवण्याचे काम हा उत्सव करतो. आयुष्यभर रक्षा करण्याचे वचन एक भाऊ आपल्या लाडक्या बहिनाबाईला देतो, तो पौर्णिमेचा दिवस म्हणजे रक्षाबंधन. ह्या क्षणाची महती खूप मोठी आहे.

रक्षाबंधन सणाच्या काही पूर्वीच्या काळापासून कहाण्या सांगितल्या जातात जसे की, " श्री कृष्णाला महाभारत सुरू असताना हाताच्या बोटाला जखम झाल्याने रक्तस्राव सुरू झाला तेव्हा रोप देणे आपल्या साडीचा पदर पाडून कृष्णाच्या जखम झालेल्या बोटाला बांधले. तेव्हापासून कृष्णाने द्रौपदीचे रक्षण करण्याचा पन केला ".

raksha bandhan essay in marathi


दुसरी कहाणी सुद्धा अशीच काही, बहादुरशहा याने चित्तोड वर आक्रमण केल्यास, चितोडगडाची राणी असलेली राणी कर्मावती हिने राजा हुमायून यास राज्याची व स्वतःचे रक्षण करण्यासाठी राजा हुमायून यास राखी बांधली होती व राजा हुमायून याने सुद्धा राणीचे रक्षण करण्याची शपथ घेतली होती.

तिसरी कहाणी इंद्र देवाची, असुरांकडून हरलेल्या इंद्र देवाच्या उजव्या हातावर, इंद्र देवाची पत्नी म्हणजेच इंद्राणी हिने रक्षासूत्र बांधले त्यामुळे इंद्र देवाचा आत्मविश्वास हा खूप वाढला त्याच जोरावर त्याने असुरांना पराभूत केले.

मराठी महिना असलेल्या, श्रावण मध्ये हा सण येतो, ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे तिच्या घरी जातो, जर बहिणीचे लग्न झालेले नसेल तर स्वतःच्या घरी सुद्धा एकप्रकारे आनंदी वातावरण असते. 

तंत्रज्ञानाची किमया निबंध


सकाळी सकाळी लवकर उठून, अंघोळ, देवपूजा झालेनंतर बहीण आरतीचे ताट सजवते, त्यामध्ये कुंकू, तांदळाचे दाणे, सोन्याची अंगठी, पेढा, पणती व एक आकर्षक राखी अशा सजावट करते. 

भाऊरायला पाटावर बसायला सांगून, तिला तो आरतीच्या ताटाने ओवाळून घेते, कुंकू लावले नंतर उजव्या हातावर राखी बांधते व सांगते जोपर्यंत ही राखी तुटत नाही तोपर्यंत सोडायची नाही, त्याला ओवाळून, पेढा चारून झाल्यास, बहीण - भावाच्या पाया पडते व आशीर्वाद घेते.

भाऊ सुद्धा बहिणीला रक्षाबंधन निमित्त रक्षा करण्याचे वचन देतो, तुला केव्हाही,  कुठलीही अडचण आल्यास हा भाऊ नेहमी तुझे रक्षण करण्यासाठी तुझ्या पाठीमागे उभा असेल. भाऊ बहिणीला ओवाळणी म्हणून तिचा मान म्हणून काही भेटवस्तू देत असतो.

रक्षाबंधन वर मराठी निबंध


आपली भारतीय संस्कृती असे अनेक सोहळे जपून ठेवते, या रक्षाबंधन सनामुळे फक्त रक्ताची नातीच नाहीतर, अनेक रक्ताची नसलेली पण जिवाभावाची नाती जोडली जातात, ती आयुष्यभर जपली जातात, वाढवली जातात. 

राखी बांधण्यासाठी काही बहिणींना भावाच्या घरी, काही कामामुळे जाता येत नसेल तर, पूर्वी पोस्टाच्या मार्फतीने काही दिवस अगोदर, भावाचा पत्ता टाकून न विसरता, राखी टपाला मार्फत पाठवली जाते. 

कोरोना मराठी निबंध


सध्याच्या युगात टपालाचा वापर राखी पाठविण्यासाठी कमी होऊ लागला, कारण हीच राखी टपालापेक्षा कुरियर द्वारे लवकर पोच होते, मात्र राखी पोस्टाने पाठवली असू नाहीतर कुरियरद्वारे पण त्यातील प्रेम तिळभर सुद्धा कमी झालेले नाही. 

तर हा होता रक्षाबंधन निबंध, आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा, तुम्हाला अजून कोणत्याही विषयावर निबंध हवे असतील तरीही ते कमेंट द्वारे कळवा. तुमच्या सूचनांचे स्वागत असेल. 
धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने