माझा आवडता पक्षी पोपट - my favourite bird parrot essay in marathi

my favourite bird parrot essay in marathi - माझा आवडता पक्षी  पोपट


चला तर आज आपण माझा आवडता पक्षी पोपट majha avdata pakshi popat यावरती निबंध लेखन करूयात, निबंध लेखनाला कोणतेही बंधन नसते म्हणून तो निबंध. माझा आवडता पक्षी  पोपट - my favourite bird parrot essay in marathi तुम्ही सुद्धा खालील निबंध कसा लिहिला आहे तसा त्याचा वहीत वापर करू शकता त्यात तुमच्या पण कल्पना नक्की टाका म्हणजे तो निबंध अजून सुंदर होईल. तर वेळ न घालवता सुरू करूया माझा आवडता पक्षी पोपट म्हणजेच my favourite bird parrot essay in marathi

my favourite bird parrot essay - majha avdata pakshi popat 

my favourite bird parrot essay in marathi
Majha avdata pakshi निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणाला आवडत नाही, कारण निसर्गाने आपल्या चहूबाजूस सौंदर्य पेरलेले आहे. कधी इंद्रधनुष्य स्वरूपात तर कुठे सुंदर अश्या हिमालयाच्या स्वरूपात तर कुठे मोर, पोपट, किंगफिशर यासारख्या पक्ष्यांच्या स्वरूपात.

मला तर जास्त आकर्षक पक्षांचे आहेत, त्यातल्या त्यात पोपटाचे, कारण तो आपली नक्कल करतो, म्हणून तर माझा आवडता पक्षी हा पोपट आहे. 

पोपटाचा आकार मध्यम आकाराचा आहे, जो वेगवेगळ्या प्रदेशात, देशात  वेगवेगळ्या रंगांमध्ये आढळतो. जगामध्ये पांढरा, निळा, हिरवा, रंगबिरंगी, पिवळा, लाल अश्या रंगामध्ये पोपट आढळतात. 


तस पाहायला गेले तर संपूर्ण जगाचा विचार करायला गेल्यास पोपटांच्या 350 पेक्षा अधिक प्रजाती आढळून येतात. पोपटाची लांबी साधारण 10 ते 12 इंच एवढी असते. पोपट बुद्धिमान, दयाळू व तेवढाच समजदार पक्षी आहे. त्याचे आयुर्मान तसे 15 ते 20 वर्षाचे असते.

माझा आवडता पक्षी  पोपट - my favourite bird parrot essay in marathi 

त्याला पोपटी रंग म्हणून तो पोपट. लाल भडक चोच, सुंदर असे डोळे, तिक्ष्ण असे नखे. पोपटाचा रंग हा हिरवा असतो. त्याचे पंख सुद्धा हिरवे असतात. पोपटाच्या मानेच्या भोवताली काळ्या रंगाचे गोलाकार असे वलय असते त्यामुळे तो अजून आकर्षक दिसतो. 

पोपट हे जरी दिसायला रंगीत असले तरी त्याची अंडी पांढरी असतात.किती जबरदस्त व लाडके व्यक्तिमत्त्व म्हणावे ह्या पक्षाचे. पोपटाला इंग्रजी भाषेमध्ये parrot तर हिंदीमध्ये तोता बोलतात.

आमच्या शाळेत शिक्षकांनी जर एखाद्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला आणि त्याला उत्तर नाही आले तर शिक्षक लगेच बोलतात, घरी असला की कसा पोपटासारखे बोलतोस आता का तुझा कावळा झाला असे म्हंटले की सर्व वर्गात हसा पिकतो.

Majha avdata pakshi popat 


पोपट हे झाडावर राहतात, अगोदरच ज्या झाडावर छिद्र असतात, मोठाली घरे असतात त्या आयत्या घरात पोपट राहतात म्हणजेच डोलीत पोपट राहतात. त्यांच्या सोबत त्याची पिल्ले सुद्धा असतात.  त्यातील जो नर पोपट असतो त्याला राघू म्हणतात तर जी मादी असते तिला मैना असे म्हणतात.

पोपट हा पाळीव पक्षी आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा एक पोपट पाळला होता, त्याला आम्ही आवडीने मिठू असे बोलत असू आमच्या आई बाबांचा तो खूप लाडका होता, त्याला पहाटे पहाटे उठून आपण जे शिकवू तसे तो बोलत असे. 

खास करून त्यांना राम राम बोलायला लोक पूर्वीपासून शिकवत असत कारण घरात नवीन कोणी पाहुणे आले की त्याचे स्वागत हे पोपट राम राम घालून करीत असत आहे ना मजेदार माहिती.

पोपटाचे आवडते खाद्य म्हणजे पेरू, त्याला पेरू खायला खूप आवडते, तसेच तो डाळींब, पाले भाज्या, सफरचंद, केळी असे अनेक फळे खातो यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की पोपट हा पक्षी शाकाहारी वर्गात मोडतो, खाताना तो त्याच्या पायाचा वापर करून ऐटीत फळे खात असतो.लोक बोलतात की पोपटाचे उष्टे खाल्ले की बोबडी लोक स्पष्ट बोलतात म्हणून काय माहीत काय खरे काय होते, त्यामुळे आमच्या घरी बाहेरून लोक आवर्जून पोपटाचा उष्टा पेरू खाण्यासाठी येत असत.

आम्ही पोपट पाळलेला आहे कारण मला पोपटसोबत खेळायला खूप आवडते वाईट मात्र एका गोष्टीचे वाटते की मी त्याचे स्वतंत्र हिरावून घेत आहे, त्याला त्याच्या मित्रांसोबत, परिवारासोबत खेळायला राहायला आवडेल म्हणून मी त्याला जंगल मध्ये सोडून दिले. 

बाहेर कुठे फिरायला गेलो व मला कुठे इतर पक्षी किंवा पोपट दिसले तर मला आमच्या मिठूची खूप आठवण येते, पण तो पिंजऱ्यापेक्षा त्याच्या घरी नक्कीच खुश असेल. त्यामुळे मला सुद्धा समाधान वाटते. म्हणून माझा आवडता पक्षी हा पोपट आहे

तर मित्रानो कसा वाटला माझा आवडता पक्षी पोपट हा निबंध आवर्जून खाली कमेंट बॉक्स मध्ये सांगा तसेच तुम्हाला पोपटा बद्दल अजून काही माहिती असेल ती सुद्धा दिली तरी आवडेल. तुम्ही लिहिलेला निबंध सुद्धा आम्हाला पाठवू शकता.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने