झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध - jhade lava jhade jagava

झाडे लावा झाडे जगवा मराठी निबंध - jhade lava jhade jagava


नमस्कार मित्रमंडळी आज आपण झाडे लावा झाडे जगवा या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत ह्या निबंध मध्ये तुम्हाला संकल्पना मिळून जातील की कशा प्रकारे निर्माण झालेला पाहिजे.  त्या प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने निबंध लिहू शकता. जर तुमच्याकडे सुद्धा असे काही निबंध असतील तर,  आम्हाला पाठवू शकता आम्ही तुमच्या नावासह प्रसिद्ध करू तर आता सुरवात करूया झाडे लावा झाडे जगवा हा निबंध - jhade lava jhade jagava essay in marathi - zade lava zade jagava marathi nibandh


lava jhade jagava essay in marathi

झाडे लावा झाडे जगवा निबंध  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, झाडे लावा झाडे जगवा याबद्दल शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आवर्जून शिकवले जाते, सध्याच्या युगामध्ये वृक्षांचे महत्त्व खूप वाढायला लागले आहे.  


कोरोना रोगाच्या वाढत्या महामारी मध्ये लोकांना झाडांचे महत्त्व आता समजले असेल कारण अनेक रुग्ण फक्त शुद्ध हवे विना मृत झालेले आहेत. 


मृत व्यक्ती यांची संख्या खूपच जास्त आहे कोरोना काळामध्ये भरपूर रुग्ण अशी आहेत की जे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मयत झालेले आहेत यावरूनच आपल्याला झाडांची व त्या झाडाद्वारे निर्मित होणारे ऑक्सिजन ची किंमत समजत असेल.


पूर्वीच्या काळात आपल्या भारत देशामध्ये वृक्षांची संख्या खूपच जास्त होती कालांतराने लोकसंख्या वाढीमुळे वृक्षांची संख्या हळूहळू कमी व्हायला लागली,  लोकसंख्येचा भस्मासुर वाटायला लागला त्याप्रमाणे झाडांची कत्तल होऊ लागली.


त्यामुळे अनेक डोंगर, पठारे, वने बोडकी झालीत ह्याच कारण कोण तर एकमेव मनुष्य प्राणी. ह्याच मनुष्य प्राण्यामुळे जंगलात राहणारी वाघ, सिंह, चित्ता असे असंख्य प्राणी भुकेने व्याकूळ होऊन मनुष्य वस्ती मध्ये फिरू लागली. उदाहरण म्हणजे आपण मुंबई मधीव आरे जंगल पाहू शकतो.


मनुष्यप्राणी गावी किंवा शहरांमध्ये घर बांधण्यासाठी पूर्वी लाकडाचा वापर होई.  झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र खेडोपाडी वापरला जात असून मात्र अजूनही लाकडांची आवक कमी झालेले दिसून येत नाही. 


एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी सध्या लाकडाचा कमी वापर होत असून त्याऐवजी चांगल्या प्रतीच्या लोखंडाचा वापर होत आहे ही गोष्ट झाडांसाठी लाभदायक आहे. जेणेकरून घर बांधण्यासाठी लाकूड तर लागणार नाही.


आपली जुनी लोकं म्हणजे आपले पूर्वज खूपच हुशार होते, त्यांनी  शेताच्या बांधावरती, घराच्या दारात अनेक झाडे लावून ठेवलेली होती,  तसेच आपल्या घराच्या शेजारी सभोवताली उपयोगी पडतील अशी झाडे लावलेली होती त्याद्वारे झाडाचे संवर्धन होईल व झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र जोपासला जाईल.


वटपौर्णिमा यासारखे सण साजरे केले जायचे कारण वड हे असे झाडे आहे,  जे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देतात त्यामुळे या वडाच्या झाडाचे संवर्धन व्हावे हा त्यामागचा एक प्रामाणिक हेतू मात्र आपण तसे न करता त्याच वडाचे डहाळी तोडून वटपौर्णिमा साजरी करतो व त्या एकमेव वृक्षाचे खूपच नुकसान करतो.


हे सुद्धा वाचा -

मी फुलपाखरू झालो तर मराठी निबंध

मेरी अभिलाषा हिंदी निबंध 


मला तर शिक्षक लोकांची एक गोष्ट खूप आवडते त्यांचे कौतुक करावे वाटते कारण ती लहान मुलांना, विद्यार्थ्यांना शाळेच्या माध्यमातून वृक्षरोपण करण्याचा सल्ला देऊन ती कृती मध्ये आणतात व वृक्षांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करतात. 


आपले सरकार सुद्धा अशा भरपूर योजना राबवत आहे ज्याद्वारे तुम्ही चंदन तसेच इतर वृक्ष सरकारकडून घेऊन त्याची जोपासना केल्यानंतर सरकार तुम्हाला ठराविक काळानंतर काही रक्कम देऊ करते. 


अशा अनेक सरकारी योजना राबविण्याचा सरकारने नक्कीच प्रयत्न केला पाहिजे पाऊस पडण्यासाठी झाडांचा वाटा हा सगळ्यात जास्त आहे.  त्यासाठी डोंगर माथा याठिकाणी निलगिरी यासारख्या वृक्षांचे रोपण करणे खूपच आवश्यक आहे.


आपला सह्याद्री हा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट केल्यानंतर तेथील अनेक दुर्मिळ वनस्पती ह्या फक्त सह्याद्री मध्येच मिळतात त्याची जोपासना करणे हे आपले कर्तव्य आहे तसेच कास पठार सातारा जिल्ह्यातील कास पठार या ठिकाणी अनेक असे फुल झाडे आहेत जी फक्त त्याच पठारावर मिळतात दुर्मिळ झाडे जगात कोणतेही ठिकाणी मिळत नाहीत. त्यांची जोपासना करणे आवश्यक आहे. 


त्यामुळे मी सगळ्यांना हा आवर्जून हेच सांगेल की आपण सुद्धा आजपासून पण करून किमान आपल्या जन्मदिवशी एक तरी झाड लावू व त्याचे संवर्धन करूया, कारण आपण सुद्धा हे समाजाचे ह्या प्रकारचे काही तरी देणे लागतो.  


एक आपण काही कल्पना करू शकतो. जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर जाताना आपण घरामध्ये जी फळे खाल्लेली आहेत त्यांच्या बिया साठवून त्या बिया प्रवासामध्ये ट्रेकिंग करताना गड-किल्ल्यावर तसेच डोंगरावरती पावसाळ्याच्या वेळेस जाता जाता लावू शकतो.


झाडांमध्ये सुद्धा असंख्य प्रकार येतात काही झाडे औषधी असतात झाडाच्या पानांमध्ये फुलांमध्ये खोडामध्ये तसेच मुळामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आढळून येतात.  तर काही झाडाने घरगुती उपयोगासाठी येतात काही बिल्डिंग बांधण्यासाठी तर काही विषारी झाडे सुद्धा असतात आदिवासी लोकांना डॉक्टरची गरज पडत नव्हती कारण पूर्वी त्यांच्यातील वैदू लोक स्वतः झाडपाल्याची औषध तयार करून ती जो कोणी आजारी व्यक्ती असेल त्यास खाऊ घालून त्यांचा आजार बरा करत असत. 


राजे,  संस्थाने संस्थानिक यांच्याकडे सुद्धा काही लोक फक्त त्यांचे तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी पूर्वीपासून काम कर त्यांना झाडपाल्याचे औषध पूर्ण ज्ञान असत मात्र सध्या ही लोक दुर्मिळ होत चाललेली आहेत कारण त्यांच्या सोबतच त्यांचे ज्ञान निघून जात आहे ते ज्ञान पुढच्या पिढीला न मिळता ते लुप्त होत आहे. 


जसं की गावी अजूनही कावीळ या रोगा वरती विडा किंवा इतर औषधी वनस्पती पासून औषध जेवणा मध्ये टाकून किंवा इतर पदार्थ मध्ये टाकून खाऊ दिले असता आपला कावीळ हा रोग बरा होतो. आपल्यालासुद्धा अनेक पदार्थ खाऊ वाटतात जसे की आंबा पेरू सीताफळ जांभूळ त्यांचे संवर्धन करणे आपले काम नाही का ?  


त्यामुळे आपण आज पासून ठरवूया किमान दर वर्षी आपण एक तरी झाड लावू तरच आपली वसुंधरा अजूनही हिरवे गार होऊन सुखी होईल व आपल्याला सुद्धा निसर्गा साठी काहीतरी केल आहे याचा अभिमान वाटेल. तर आपण सुद्धा आजपासून झाडे लावा झाडे जगवा हा मंत्र जोपासू या जय भारत जय महाराष्ट्र जय वसुंधरा.


मित्रांनो कसा वाटला झाडे लावा झाडे जगवा हा निबंध. तुम्हाला अजून कोणत्या विषयावरती निबंध हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला आवर्जून तो निबंध लवकरात लवकर उपलब्ध करून देईल. धन्यवाद.

हे सुद्धा वाचा - 

पाणी हेच जीवन निबंध

हिंदी निबंधकरिता येथे क्लीक करा - हिंदी निबंध 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने