मी अनुभवलेला लॉक डाउन मराठी निबंध - me anubhavlela lockdown marathi nibandh

मी अनुभवलेला लॉक डाउन मराठी निबंध - me anubhavlela lockdown marathi nibandh


नमस्कार मित्र मंडळी कसे आहात, कोरोनाच्या काळात स्वतःची काळजी घेत आहात ना ? हात वेळोवेळी धुवत रहा, आवश्यक असेल तरच प्रवास करा. कारण तुमचे जीवन अनमोल आहे.

तर आज आपण वर्णनात्मक निबंध, मी अनुभवलेला लॉक डाउन मराठी निबंध, me anubhavlela lockdown marathi nibandh लिहिणार आहोत. तर चला सुरू करूया ! 

मी अनुभवलेला लॉक डाउन मराठी निबंध 


कोरोना सारख्या महामारी मुळे जगाला काही क्षण थांबायला लावले, चीनच्या वूहान शहरातून जगभर पसरलेल्या ह्या covid 19 ने सर्व जगाची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली.  

संसर्गजन्य असलेला हा रोग, सहजरित्या हवेतून पसरतो, त्यामुळे भारत सरकारने तसेच महाराष्ट्र सरकारने नागरिकांना वरती काही निर्बंध लादले. दुकाने, मंदिरे, प्रार्थना स्थळे, हॉटेल्स, चित्रपटगृह इत्यादी ठिकाणी नागरिकांना जाण्यास मज्जाव केला. 

मी अनुभवलेला लॉक डाउन मराठी निबंध - me anubhavlela lockdown marathi nibandh

मी अनुभवलेला लॉक डाउन निबंध - me anubhavlela lockdown nibandh




दुकाने, हॉटेल्स, भाजीपाला मार्केट उघडण्याच्या वेळा ठरवण्यात आल्या, ह्या बाकीच्या वेळी सुरू असायचा लॉक डाउन. हो मी अनुभलेला लॉक डाउन.

मी सुद्धा परळ येथील एका खाजगी कंपनी मध्ये नोकरीला होतो व बदलापूर सारख्या उदयास येऊ पाहणाऱ्या शहरात राहत होतो. दिवसेंदिवस कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत होती.

अनेक देशात दुसऱ्या देशातून विमान वाहतूक पूर्णतः बंद केलेली होती. महाराष्ट्र सरकारने सुद्धा जिल्हा अंतर्गत प्रवास योग्य कारणाशिवाय करता येणार नाही, ज्याला प्रवास करावयाचा असेल त्यास online paas काढावा लागे.

अनेक सार्वजनिक ठिकाणी जाण्यास, सण साजरे करण्यास निर्बंध लादण्यात आले. लग्न लावताना सुद्धा नवरा व नवरी यांचे बाजूकडील ठराविक लोकांनाच परवानगी देण्यात आली.

त्यात राज्य सरकारने लोकल फक्त आपत्कालीन काम करणारे कर्मचारी यांचे करिता सुरू ठेवली इतर सामन्य नागरिक यांना लोकल प्रवास बंद करण्यात आल्याने मी खूप टेन्शन मध्ये गेलो.

कारण मी स्वतः खाजगी कंपनीमध्ये नोकरी करीत असल्याने बदलापूर ते परळ असा प्रवास लोकल विना करणे खूप त्रासदायक तर होतेच पण खर्चिक सुद्धा होते, जेवढा पगार त्याच्या अर्ध्याहून जास्त खर्च तर प्रवासात होऊ लागला.

me anubhavlela lockdown marathi nibandh


आमच्या कंपनीने सुद्धा कर्मचारी कपात केले, त्याचबरोबर पगारात सुद्धा 25 टक्के कपात केली. खरच मी काय पाप केले मलाच समजले नाही. कारण बदलापूर वरून एसटी पकडून कामाच्या ठिकाणी जायला 2 तास लागे. त्यात तिकीट सुद्धा लोकल पेक्षा जास्तीची.
789
मी अनुभवलेला लॉक डाउन खरच खूप वाईट अनुभव देऊन गेला. नोकरीच्या बाबतीत, माझ्या मुलाचे व मुलीचे शाळेच्या बाबतीत तर खाजगी शाळा आहे तेवढीच फी घेत, मुलांना शिकवणी ऑनलाइन असायची मात्र फी मध्ये काही कमी नव्हती.

खाजगी शाळेकडे सरकारने कानाडोळा केला, मात्र आमच्या सारखे सामान्य लोक यामध्ये होरपळून निघाले. जे लोक आजारी होते, त्यांना वेळेवर रुग्णवाहिका सुद्धा मिळत नव्हती जर मिळालीच तर हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नव्हते. 

तंत्रज्ञानाची किमया निबंध


महामारी मध्ये राज्य व केंद्र सरकारने अगोदरच प्रतिबंधात्मक उपाय योजना आखली पाहिजे, जेणेकरून आकस्मित रित्या उदभवणाऱ्या समस्यांवर उपाय योजले जातील.

मी अनुभवलेल्या lock down मध्ये मला नोकरी करण्यास खूप त्रास झाला, मात्र काही महिन्याने आमच्या ऑफिसमध्ये WFH म्हणजेच work from home घरी बसूनच काम करण्यास सांगितले गेले.

मंग आता काय, पगार कमी होताच मात्र प्रवासाचे पैसे वाचत होते व घरच्यांना वेळ देने शक्य होत होते. त्यात मी माझा जुना छंद पुस्तक, ग्रंथ वाचण्याचा पुन्हा सुरू केला. अधूनमधून पेन्सिल च्या साह्याने चित्र सुद्धा काढू लागलो.

मात्र ह्या lockdown मध्ये सकाळी सकाळी लवकर उठून भाजीपाला आणावयास मलाच जावे लागे, कारण सरकारने भाजीपाला मार्केट उघडण्याच्या व बंद करण्याचा वेळ ठरवल्या होत्या.

मनापासून एक सांगावी वाटते की, ह्या lock down मध्ये सामान्य लोकांचे खूप हाल होतात, त्यांच्या नोकऱ्या जाणे, त्यांना वेळेवर वैद्यकीय मदत न मिळणे, वाढती महागाई यामुळे सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय यांना खूप त्रास सोसावा लागला.

भारत सरकारने कोविड रोगासोबत लढण्यासाठी लस उपलब्ध करून दिल्या मात्र, त्याने सुद्धा कोरोना थांबेना तो लस घेतली तर होत असल्याचा निष्कर्ष निघाला, पण लसीकरणाने शारीरिक क्षमततेत वाढ होत होती. 

ग्रंथ हेच गुरू निबंध


तस लॉक डाउन चा विचार करता, त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे सुद्धा आहेत. फायदे म्हणाल तर मला कुटूंबाला वेळ देता आला, आवडीचे छंद झोपसता आले, थोडी धावपळ कमी होऊन व्यायाम करता आला.

लॉक डाउन चे तोटे म्हणाल तर, बऱ्याच लोकांना नोकरी गमवावी लागली, अनेकांचे उद्योग धंदे बंद पडले, अनेकांचे नातेवाईक, मित्र, पालक हे कोरोनाच्या सावटाखाली गेले. 

तर मंडळी कसा वाटला मी अनुभवलेला लॉक डाउन ( lock down ) हा मराठी निबंध, me anubhavlela lockdown marathi nibandh, तुमच्याकडे असलेले निबंध तुम्ही आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते तुमच्या नावासह प्रसिद्ध करू.

धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने