Subhash chandra bose essay in marathi - सुभाषचंद्र बोस मराठी निबंध

Subhash chandra bose essay in marathi - सुभाषचंद्र बोस मराठी निबंध

आज आपण भारताचे एक खरे खुरे हिरो नेताजी  सुभाषचंद्र बोस यांची माहिती घेणार आहोत व त्यांच्यावर Subhash chandra bose essay in marathi - सुभाषचंद्र बोस मराठी निबंध लिहिणार आहोत. 

तुम हमे खून दो मे तुझे आझादी दुंगा हे वाक्य आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी नेताजींनी म्हंटले होत व आपल्या भारतीय लोकांना त्यांच्या आझाद हिंद फौज मध्ये सामील व्हावे यासाठी त्यांनी ही उद्घोषणा केली होती. तुमच्या रक्ताची किंमत देश स्वतंत्र होण्यास होईल असे त्यांचे म्हणणे होते. 

Subhash chandra bose essay in marathi - सुभाषचंद्र बोस मराठी निबंध

सुभाषचंद्र बोस यांच्यावर निबंध

आपल्या लाडक्या नेताजींचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओडिशा राज्यातील कटक शहरामध्ये एका हिंदू कुटुंबात झाला. सुभाषचंद्र बोस यांचे वडिलांचे नाव जानकीनाथ बोस जे कटक मधील सुप्रसिद्ध वकील होते आणि आईचे नाव प्रभावती बोस होते. 

त्यांच्या सुरुवातीच्या काळात सुभाषचंद्र बोस यांनी कटक शहरातील राजवाड्यात काम केले. नेताजी  बंगाल विधानसभेचे सदस्यही होते. नेताजींची कामगिरी पाहून ब्रिटिश सरकारने त्यांना रायबहादूर ही पदवी प्रदान केली. 

कालांतराने सुभाषचंद्र बोस यांना ब्रिटिश हेच आपले खरे शत्रू असल्याची खात्री झाल्याने त्यांनी भारतीय स्वतंत्र युद्धात आग्रहाने भाग घेतला.  ब्रिटिश राजवट जोपर्यंत भारतातून बाहेर जाणार नाही तोपर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र होणार नाही, यासाठी स्वतः  दुसर्‍या महायुद्धाच्या काळात इंग्रजांविरुद्ध लढा देण्यासाठी जपानच्या पाठिंब्याने आझाद हिंद फौजची स्थापना केली. त्याच आझाद हिंद सेनेचा “तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा”  हा नारा होता.  

सुखदेव मराठी निबंध 

झाशीची राणी लक्ष्मीबाई मराठी निबंध 

ब्रिटिश सरकार उलथून टाकण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जर्मनी व जपान ह्या देशांना भेटी देऊन त्यांची मदत मिळवण्याचा प्रयत्न सुध्दा केला होता. याचा सुगावा इंग्रजांना लागला असता सुभाषचंद्र बोस यांना संपविण्यासाठी इंग्रजांनी कट कारस्थान रचले. सन ५ जुलै १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरच्या टाऊन हॉलसमोर आझाद हिंद सैन्याला “सुप्रीम कमांडर” म्हणून संबोधित केले व सुप्रसिद्ध अशी “दिल्ली चलो!” ही घोषणा दिली होती.

आपल्याला अभिमान वाटेल नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इम्फाल आणि कोहिमासह जपानच्या सैन्यासमवेत ब्रिटीश आणि राष्ट्रकुल सैन्याने एकत्रितपणे बर्मामध्ये जोरदार मोर्चा काढला होता. १९४४ मध्ये आझाद हिंद फौजने पुन्हा इंग्रजांवर हल्ला केला आणि काही भारतीय प्रांत ब्रिटिशांपासून मुक्त केले. मात्र नेताजींचा मृत्यू एका विमान अपघातात झाला अस म्हंटले जाते मात्र याबद्दल अद्याप योग्य असे पुरावे उपलब्ध नसल्याने हे एक कोडेच बनून राहिले आहे. 

सुभाषचंद्र बोस यांच्यावरील अगदी थोडक्यात निबंध कसा वाटला नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने